गंगापूर, (प्रतिनिधी) : सर्वप्रथम महापुरुषांना अभिवादन मुख्य शासकीय ध्वजारोहण नवीन तहसिल कार्यालयात ९ ५ वाजता तहसीलदार नवनाथ वगवाड यांचे हस्ते करण्यात आले. नायब तहसीलदार व तहसील कार्यालयाचे कर्मचारी व नागरिकांची विद्यार्थ्यांचे उपस्थिती होती.
सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय मैदानावर संस्कृतिक कार्यक्रम चा आयोजित करण्यात आला होता.
गंगापूर तहसील कार्यालय येथे यावेळी प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांच्यासह आदी उपस्थित होते. याप्रसंगी गंगापूर तालुक्यांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह जिल्हा परिषद तर विद्यार्थी विविध महापुरुषांची वेशभूषा धारण करत विविध मनोरंजनपर कार्यक्रम पार पडले. गंगापूर नगर परिषद व शहरातील मारुती चौकातील ध्वजारोहण नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष अमोल जगताप, आगळे, चाऊस, मुख्याधिकारी संतोष नगरसेवक फैसल राष्ट्रवादीचे गटनेते संतोष अंबिलवादे, अनिस कुरेशी, वर्षा विशाल गायकवाड, नगरसेवक सोपान देशमुख, नगरसेवक सय्यद अख्तर, दिनेश गायकवाड, खलोद नाहादी, बदर जहुरी, वजोद कुरेशी, बाळू शेठ गुंड्याच्या, मेजर भाऊसाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी स्वप्नील लघाणे, सलीम जागीदार, गणेश ठुबे, रामेश्वर करडीले, विशाल सैवर, लोपा मुद्रा चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
गंगापूर प्रभारी उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गंगापूर पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक अनिल झिरे, भागवत खाडे, मनोज नवले, संदीप राठोड यांनी सहायक पोलीस फौजदार यांच्यासह यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी पंचायत समिती कार्यालय पंचायत समिती कार्यालयाचे ध्वजारोहण सभापती कविता रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपसभापती राजेश्वर हिवाळे, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, सहा. गटविकास अधिकारी अक्षय भालेकर, गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गटशिक्षणाधिकारी समाधान आराख, विस्तार अधिकारी भारत घुगे, संदेश चव्हाण, सुनील खंडाळे, आसीफ अली, साहेबराव पाटील, मुजीब पठाण, अशोक घोडके, अशोक पाटेकर, कारभारी नेटके, कनिष्ठ सहाय्यक कल्पना कोतकर, दिपाली पुराणीक, अर्चना कदम, सुजाता ठोंबरे, मनीषा सोनवणे, प्रमोद देवरे, राजू सदाशिवे, सचिन गवांदे, आदी उपस्थित होते. गंगापूर तुराबुल हक उर्दू शाळेत नगरसेवक फैसल चाऊस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्याक इम्रान पठान, शबाना यांच्यासह आदी उपस्थीत होते.
गंगापूर तलत उर्दू शाळा
मुख्याध्याक अरशद खान, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जबीन बेगम, इफत, रशिदा, ईशरत, सुफीया, समीना, अकीना, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
उपस्थित होते. अरबी मदरसा खैरुल उलुम येथे अजीम शेख यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी मौलाना मुख्तार फौज, फौज सिद्दीकी, मौलाना मोहसीन, यांच्यासह नागरिक व अरबी मदरसा शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. वस्तानवी उर्दू शाळा मध्ये नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी मौलाना अमीर मुबीन साहब, नगरसेवक फैसल चाऊस, बदर जहुरी, फैसल बासालाने, मौलाना जहीर नदवी, मौलाना फौज सिद्दीकी, मौलाना मोहसीन, जुबेर सिद्दिकी, फैसल बासलोन यांच्यासह नागरिक व अरबी मदरसा शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिवसाला गंगापूर नगर परिषद येथे कार्याल्यला आकर्षित रोषणाईने सजावट करण्यात आले याचा शहरचे नागरिकांनी नगराध्यक्ष संजय जाधव व उपनगराध्यक्ष अमोल दादा जगताप यांचे कौतुक केले.














